ठाकरेंची शिवसैनिकांना तंबी ; अन्यथा मी भाजपला मतदारसंघ सोडेन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मातोश्रीवर दररोज प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराची निवड करण्यासाठी बैठक पार पडत आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षांतर्गत असणारी गटबाजी हा वैतागवाना मुद्दा वाटतो आहे .  म्हणून त्यांनी शिवसैनिकांना तंबीच दिली आहे. मी देईल त्या उमेदवाराला मदत करा , अन्यथा मी अंतर्गत वाद असणारा मतदारसंघ भाजपला सोडेन …! असे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत युती केल्यापासून शिवसेनेत लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत वाद निर्माण झाले आहेत. त्यालाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे अंतर्गत वाद मिटले नाहीत तर तो मतदारसंघ भाजपला सोडून मी मोकळा होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठी गटबाजी उफाळली आहे. उस्मानाबाद, परभणी या दोन मतदारसंघातील विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नये असे स्थानिक शिवसैनिकांनी म्हणले आहे. प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या बद्दल स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत. रवींद्र गायकवाड यांनी मतदारसंघात कोणतीच कामे केली नाहीत म्हणून त्यांना उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केला आहे. मी उमेदवार देईल त्याचे काम करा , अन्यथा मतदारसंघ मी भाजपला सोडेल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.