चौथ्या आघाडीच्या तयारीत असलेल्या जाणकरांना भाजपने भरला दम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात डावलले जात असल्याने नाराज झालेल्या महादेव जानकर यांनी चौथ्या आघाडीची तयारी केली होती. चौथ्या आघाडीचा प्रयोग करण्यासाठी सरसावलेल्या जाणकरांना भाजपने दम भरला आहे. त्यामुळे जानकरांच्या चौथ्या आघाडीचे स्वप्न हवेत विरले आहे.

लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजपने घटक पक्षांना जागा सोडल्या होत्या. मात्र यावेळी शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर भाजपच्या गोटातील घटक पक्षांना भाजपने वाऱ्यावर सोडल्याची भावना घटक पक्षांची झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व कॅबिनेटमंत्री महादेव जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची नुकतीच पुण्यात भेट घेतली होती.

या भेटी दरम्यान जानकर यांनी चौथ्या आघाडीबाबत चर्चा केली होती. मात्र शेट्टी यांच्यासह “स्वाभिमानी’तून बाहेर पडलेले सदाभाऊ खोत, रिपब्लकिन पक्षाचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी या आघाडीत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना शांत बसण्याचे आवाहन करीत दम भरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जानकर यांचा नाइलाज झाला आहे.

You might also like