बसपा राज्यात लोकसभेच्या ४८ जागा लढणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अजून ही काही मतदारसंघातील जागेचा तिढा सुटलेला नसतांना, बसपाने मात्र आपल्या सर्व ४८ जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या २० मार्चला पहिली यादी जाहीर केली जाणार असून, पहिल्या यादीमध्ये विदर्भातील बहुतांश मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती जेष्ठ नेत्यांनी दिली.

राज्यात बसपाची विचारधारा मानणाऱ्या उमेदवारांना पक्षाची उमेदवारी देण्यात येणार आहे. तसेच समाजवादी पक्ष सोडता इतर कोणत्याही राज्यात कॉंग्रेस सोबत बसपा आघाडी करणार नाही, अशी घोषणा “बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी अलीकडेच काही महिन्यापुर्वी केली होती. त्यामुळे बसपा राज्यात संपुर्ण ४८ जागावर स्वबळावर निवडणुक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील ४८ मतदारसंघात बसपची विचारधारा मानणाऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात येणार आहे.

बसपाची पहिली यादी जाहीर केली जाणार त्यात किमान ८ ते १० उमेदवारांची नावे असणार आहेत, अशा माहिती बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली.