‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से’ ; भुजबळांची घोषणाबाजी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राष्ट्रावादीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. तसंच भाजप सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से’ अशी घोषणा छगन भुजबळ यानी केली. नागपूरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

भुजबळ यांनी भाषणाच सुरुवात केली ती ‘अच्छे दिन’ आले काय ? १५ लाख खात्यात आले काय ? असा सवाल करीत. एका दिवसात कष्टाने कमावलेल्या पैशाचे कागद करीत नोटाबंदी लादली. यातून १ कोटी व्यवसाय बुडाले, असा घणाघात त्यांनी केला. आजही ते व्यावसायिक उभे राहू शकले नाहीत. काळा पैसा जमा होईल, दहशतवाद संपुष्टात येईल, असे मोठे दावे केले गेले. परंतु दहशतवाद आणखी वाढल्याचे, भुजबळ यांनी नमुद केले. तसंच नोटबंदीचा निर्णयही फसला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राफेल खरेदी प्रकरण राहुल गांधी यांनी बाहेर काढले. या प्रकरणाची फाइलच गहाळ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. महागाई शिगेला पोहोचली असून काँग्रेसच्या काळात खिशात पैसे घेऊन खरेदीस गेल्यास गोणीभर सामान घरात येत होते. आता पुन्हा भाजप सरकार आल्यास गोणीभर पैशांमध्ये खिशातही सामान येणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, केंद्र सरकार केवळ विविध समुदायांत फूट पाडण्याचे काम करीत आहे. पानसरे, दाभोलकर प्रकरणातून उच्च न्यायालय जाब विचारत आहे, अस म्हणत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like