नगरमध्ये काँग्रेस, शिवसेना महाआघाडीचा सुजय विखेंना पाठिंबा ; काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगरमधील नगर तालुक्यातील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष यांनी भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. अहमदनगरमधील राजकारण वेगळ्याच दिशेला जाताना दिसत आहे.

नगर तालुका काँग्रेस, शिवसेना महाआघाडीने आज भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सामील झाले होते. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीने लोकसभा निवडणूकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचं काम करण्याचा निर्धार केला आहे.

सुजय विखे यांच्या मतोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा परिषद निवडणूकीत नगर तालुक्यात शिवसेना-काँग्रेस आघाडीला मदत केली होती. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस-सेना महाआघाडी सुजय विखे यांना मदत करणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हाराळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, सुजय यांना मिळालेल्या या पाठिंब्यामुळे आता राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Loading...
You might also like