राज्यात कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान ? पहा आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी आजचा तिसरा टप्पा सर्वात मोठा टप्पा होता. एकूण ११७ जागांवर होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील १४ जागांचा समावेश आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागात मतदानासाठीचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. आता राज्यातील १४ मतदार संघांवर ५ वाजेपर्यंत किती मतदान झाले याची आकडेवारी पाहूया. ही अंतिम आकडेवारी नसून मतदान बंद होण्यापूर्वी एक तास आधीची आकडेवारी आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पुणे (४४. ४५) लोकसभा मतदार संघात सर्वात कमी मतदान झाले आहे. तर सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदार संघात झाले आहे.

मतदानाची संघनिहाय आतापर्यंतची आकडेवारी

सातारा – ५५. १७%

सांगली – ५६. ७९%

रावेर -५५. ८५%

रत्नागिरी -सिंधुदुर्ग – ५७. २५%

रायगड – ५३. १५ %

पुणे- ४४. ४५%

माढा – ५६ .३७%

कोल्हापूर- ६५. ७६%

जालना- ५९. ९१%

जळगाव- ५२. ०४%

हातकणंगले- ६५. ५९%

बारामती-५५. ६४%

औरंगाबाद- ५६. ३७%

अहमदनगर -५३. ८८%

टिप : वरील आकडेवारी ही ५ वाजेपर्यंत किती मतदान झाले याची आहे.