माढ्यातून मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळणार होती : जयंतराव पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. त्यांच्या नावावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तबही केले होते.  तुमच्या नावावर शक्कामोर्तब झाले असल्याचे त्यांना कळवण्यात आले होते. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी प्रतिक्रीया दिली. अनेक वर्षापासून मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी राज्याच्या मंत्रीपदावर काम केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदही भूषविले आहे. तसेच ते खासदारही होते. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हेही खासदार होते. आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणार होती. परंतु त्यांनी दुसरे नाव दिले होते. त्यांनी सुचवलेल्या नावाला कार्यकर्त्यांकडून विरोध केला गेला. त्या संदर्भात चर्चा करणार होतो.  आजही राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज पक्ष सोडला. त्यांच्याविषयी वेगळं आणि वाईट बोलणं योग्य नाही असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

माढा मतदारसंघात आम्ही निष्कर्षापर्यंत आलो आहोत की, आम्ही सक्षम उमेदवार देवू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माढा जिंकण्याचा भ्रम तुटेल असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला. निवडणूका येतात त्यावेळी अनेक प्रश्न असतात. सत्ता असली त्याजवळ जाणारे असतातच. कच्चे दुवे सत्ताधारी साधत असतात असे सांगतानाच माढातील ताकदीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मांडली.

Loading...
You might also like