देशात भाजपा आघाडीवर, भाजप अध्यक्ष 25 हजार मतांनी आघाडीवर ; महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर घ्या जाणून..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली असून भाजप आणि मित्र पक्षांनी 147 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष 57 जागांवर आघाडीवर आहेत. इतर पक्ष देखील 30 जागांवर आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने चांगलीच आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेचे काहीसे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गांधीनगर लोकसभा मतदार संघातुन अमित शहा हे सुमारे 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
गिरीष बापट

महाराष्ट्रातील हे उमेदवार मतमोजणीच्या सुरवातीलाच आघाडीवर (हा अंतिम निकाल नाही)
1. परभणी : शिवसेनेचे संजय जाधव आघाडीवर
2. शिरूर  : राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर
3. माढा : राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे
4. रायगड : राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे
5. सिंधुदुर्ग : शिवसेनेचे विनायक राऊत
6. सोलापूर : काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे
7. पुणे : गिरीष बापट
8. बारामती : सुप्रिया सुळे