Video : सनीच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा वर्षाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने आज (मंगळवार दि 23 एप्रिल) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल पंजाबच्या गुरदासपूर मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांच्या उपस्थितीत सनी देओलने भाजपात प्रवेश केला आहे. सनी देओलच्या भाजपा प्रवेशानंतर आता सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. यात अनेक फोटो आणि व्हिडीओंचा समावेश आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मीम्समध्ये नेटकऱ्यांनी राम मंदिर, पाकिस्तान, दहशतवाद, काँग्रेससह अनेक मुद्द्याचा समावेश असल्याचे दिसत आहे. सनी देओल गदर या सिनेमातील हापशाच्या दृश्याचा सर्वाधिक वापर केल्याचे दिसत आहे. एअर स्ट्राईकला धरूनही मीम्स तयार केल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानात हँडपंपला लावले कुलूप

सध्या हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सनी देओलच्या काही सिनेमांच्या दृश्यांनाही एडिट करत विनोदी संवाद त्यात घातल्याचे दिसत आहे. काही मीम्स मध्ये एकीकडे सनी भाजपात प्रवेश करताना तर शेजारीच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा चिंताग्रस्त फोटो दिसत आहे.

सनी देओलच्या भाजपा प्रवेशानंतर पाकिस्तानमधील परिस्थिती.

पहिला सर्जिकल स्ट्राईक हा तारासिंहनेच केला होता.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like