खा. उदयनराजे अब्जाधीश उमेदवार ; मात्र, ‘एवढे’ आहे वैयक्‍तिक कर्ज

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार उदयनराजे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ते अब्जाधीश असल्याचे समोर आले आहे. उदयनराजेंकडे 1 अब्ज 16 कोटी 35 लाख रूपये किंमतीची शेतजमीन असून त्यांच्याकडे 12 कोटी 31 लाख 84 हजारांची जंगम आणि 1 कोटी 13 लाख 9 हजार रूपयांची स्थावर मालमत्‍ता आहे. उदयनराजेंकडे 1 कोटी 33 लाख 75 हजार रूपये किंमतीचे 37 किलो सोने आहे. दरम्यान, उदयनराजेंवर 35 लाख 69 हजार रूपयांचे वैयक्‍तिक कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद करण्यात आले आहे.

खा. उदयनराजे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सन 2017-2018 मध्ये 1 कोटी 15 लाख 71 हजार रूपयांचे उत्पन्‍न दर्शविले असून ते करप्राप्‍त आहे. उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजे यांचे उत्पन्‍न 8 लाख 72 हजार 774 रूपये असून ते करप्राप्‍त आहे तर हिंदू अविभक्‍त कुटूंबा म्हणून 16 लाख 13 हजार रूपयांचे करप्राप्‍त उत्पन्‍न त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये नमुद केलेले आहे. 18 लाख 15 हजार 850 रूपयांची रोकड उदयनराजेंकडे तर दमयंतीराजेंकडे 1 लाख 57 हजार 23 रूपयांची रोकड आहे. अविभक्‍त कुटुंब म्हणून 3 लाख 25 हजार 691 रूपयांची रोकड त्यांच्याकडे आहे. वेगवेगळया बँकामध्ये उदयनराजेंच्या 29 लाख 76 हजार 166 रूपयांच्या मुदत ठेवी आहे तर पत्नी दमयंतीराजेंच्या नावे विविध बँकेत 38 लाख 83 हजार 970 रूपये आहेत. अविभक्‍त हिंदु कुटूंबांच्या नावाने 21 लाख 15 हजार रूपयांची रक्‍कम बँकेत शिल्‍लक आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर्स आदींमध्ये राजेंच्या नावाने 1 कोटी 41 लाख 86 हजार रूपये गुंतविलेले आहेत. बिटकॉनमध्ये दमयंतीराजेंची 4 लाखाची गुंतवणुक आहे. 8 कोटी 16 लाख 54 हजार रूपये वेगवेगळया कंपन्या, विविध संस्था आणि भागिदारी संस्थांना दिलेले आहेत.

उदयनराजे यांच्याकडे मर्सिडिज बेन्ज, ऑडी, इन्डिवर, मारूती जिप्सी या अलिशान गाडया असून त्यांची किंमत 91 लाख 70 हजार आहे तर दमयंतीराजे यांच्या नावावर चार लाख रूपये किंमतीची पोलो ही चारचाकी आहे. दमयंतीराजेंकडे 32 लाख 98 हजारांचे सोन्याचे दागिने आहेत तर उदयनराजेंकडे 1 कोटी 33 लाख 75 हजार रूपये किंमतीचे 37 किलो सोने आहे. हिंदू अविभक्‍त कुटुंबाकडे 23 लाख 61 हजारांचे दागिने आहेत. उदयनराजे यांच्याकडे 1 अब्ज 16 कोटी 35 लाख 73 हजार रूपये किंमतीची शेतजमिन असुन त्यामध्ये 18 कोटी 31 लाखांची बिगरशेती जमिन आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंवर 35 लाख 79 हजार रूपयांचे पर्सनल (वैयक्‍तिक) कर्ज आहे. उदयनराजेंकडे 26 लाख 37 हजारांच्या वाणिज्य इमारती तर 22 कोटी 31 लाख 92 हजारांची निवासी इमारत आहे. त्यांच्याकडे एकुण 1 अब्ज 57 कोटी 25 लाखांची संपत्‍ती आहे.