तुमची झाली युती आणि माझी झाली माती : आठवले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप शिवसेना युती झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रामटेक मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले. यामुळे नाराज झालेल्या आठवलेंनी आपल्या खास शैलीत मन की बात बोलून दाखवली. तुमची झाली युती आणि आमची झाली माती, असे आठवले यांनी नागपूरमध्ये गडकरींच्या प्रचारसभेत सांगितले.

यंदाच्या निवडणुकीत रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई किंवा रामटेक या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. भाजपा आणि शिवसेनेची युतीची शक्यता त्यावेळी दिसत नव्हती आणि त्यामुळे आठवले समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या. खुद्द आठवले यांनी दोन मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, भाजपा आणि शिवसेना युती झाली आणि आठवले यांचे लोकसभेचे स्वप्न भंगले. आज झालेल्या नागपूर येथील सभेत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

नाना पटोले यांना इथे यायचे असेल तर येऊ द्या, पण निवडणुकीनंतर पुन्हा गोंदियात जाऊ द्या. असे अवाहन रामदास आठवले यांनी नागपूरातील जनतेला यावेळी केले आहे. आज विदर्भात आले आहे अमित शाह, विदर्भात आम्ही जिंकणार जागा १०. नाना पटोलेकडे वाकड्या नजरेने पाहा आणि सर्वांनी नितीन गडकरींच्या बाजूने रहा, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गडकरींचा प्रचार केला.

विदर्भात गुरुवारी मतदान होणार असून आज मंगळवारी प्रचाराचा शेवट अमित शाह यांच्या सभेने झाला. नागपूरमध्ये अमित शाह यांनी नितीन गडकरी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत रामदास आठवले यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले.

Loading...
You might also like