आता विखे-पाटलांचे काॅंग्रेसमधील भविष्य धोक्यात ? ; अशोक चव्हाणांनी भरसभेत दिले ‘हे’ संकेत

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – पक्षविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आता विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीत  देखील लवकरच निर्णय होईल असा इशारा काँग्रेस प्रेदशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना येथील सभेत बोलताना दिला. जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.20) भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

सभेवेळी बोलताना चव्हाण म्हणाले, ‘निवडणुकीच्या काळात काहीजणांनी पक्षाविरोधात भानगडी केल्या. जालना व औरंगाबाद मतदारसंघाची उमेदवारी ठरवताना सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अब्दुल सत्तारांनी त्यास विरोध केला. त्यानंतरही पक्षांनी त्यांना उमदेवारी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ते औरंगाबदमधूनही उभे रहिले नाही. उलट दोन्ही ठिकाणी वेगळी भुमीका घेतली. पक्षात असे चालणार नाही”.असे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर विखे देखील भाजपत प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले होते. अनेकदा ते भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करीत असल्याचे माध्यमांमधून वृत्त येत होते. त्यावरून काँग्रेसनेत्यांकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

यावेळी आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, उमेवार विलास औताडे, भिमराव डोंगरे, राजाभाऊ देशमुख, यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

You might also like