Loksabha Election Result 2019 : कोकण, मुंबईत युतीचा ‘मुसंडी’ ; राज ठाकरे फॅक्टरचा करिश्मा ‘गायब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोकण आणि मुंबईत महायुतीने आतापर्यंत मोठी मुसंडी मारली असून त्यात रायगडमधील जागा वगळता १२ पैकी ११ जागेवर महायुती आघाडीवर आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्यावर आघाडी घेतली आहे.

अनंत गिते यांच्याविरोधात मोठी नाराजी होती. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्तेही प्रचारात फारसे दिसून येत नव्हते. नारायण राणे यांना सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत मनसे फॅक्टर जोरदार चालणार असे वाटत होते. मात्र, सध्याच्या स्थितीवरुन राज ठाकरे यांचा व्हिडिओ चालला नसल्याचे दिसून येत आहे.