Lok Sabha Election Result 2019 : औरंगाबादमधून इम्तियाज जलील आघाडीवर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चौरंगी लढतीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेऊन राज्यातील सर्वाधिक धक्कादायक सुरुवात केली आहे.

औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे गेली ३० वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई जाधव यांनी येथून बंडखोरी केली आहे़ त्यांना दानवे यांनी मदत केल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. तो मतदानातून खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेत सर्वांना धक्का दिला आहे. तर साताऱ्यातून सुरुवातीला आघाडीवर असलेले छत्रपती उदयन राजे हे नंतर पिछाडीवर पडले आहे.

दोन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री नांदेडचे खासदार अशोक चव्हाण आणि सोलापूरचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे आता पिछाडीवर गेले आहेत.