दुसरी फेरी : सुप्रिया सुळे ८ हजार तर पार्थ १२ हजार मतांनी मागे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुसऱ्या फेरीअखेर बारामतीमध्ये भाजपच्या कांचन कुल यांनी आघाडी घेतली असून खासदार सुप्रिया सुळे या ८ हजार मतांनी मागे पडल्या आहेत. तर मावळमध्ये पार्थ पवार हे पहिल्या फेरीपासून पिछाडीवर पडले आहेत.
त्यामुळे बारामतीत धक्कादायक निकाल लागणार असे जे भाजपकडून सांगितले जात होते, त्याची ही चाहुल आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

औरंगाबाद हा राज्यातील एकमेव मतदारसंघ आहे की त्यात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तेथे एमआयएमचे इम्तियाज जलील हे सध्या ४ हजार मतांनी पुढे असून अपक्ष जाधव हे दुस ऱ्या क्रमांकावर आणि चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान आत्ताच आलेल्या आकडेवारीनूसार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा ४ हजार मतांची आघाडी घेतली.