मोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी साहेब आमचं घर भरलेल आहे. त्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित नाही, त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना लगावला.

मोदींवर निशाणा साधताना शरद पवार पुढे म्हणाले, मोदी इतरांच्या घरात डोकावतात मात्र त्यांच्या घरात कोणी आहे की नाही, हेच देशाला माहित नाही. मोदी इतर वेळी ठीकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येते अशी टीका त्यांनी मोदींवर केली.

कार्य़कर्त्यांची संवाद साधताना व्यक्तिगत टीका करू नका कारण व्यक्तिगत टीका करण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली आहे. येत्या १० तारखेला ते बारामतीत येणार आहेत, त्यावेळी ते टीका करतील. वर्ध्यात त्यांनी माझ्यावर टीका केली. त्यामुळे टीका करण्याचे काम त्यांच्याकडे दिले असल्याचा, टोला देखील शरद पवारांनी लगावला.

मोदी आणि माझे संबंध चांगले आहेत. मी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही हे त्यांनाही माहित आहे. मोदी पंतप्रधान होणार नाहीत मात्र ते खासदार तरी होतील. आमची भेट झाल्यावर त्यांना आमच्या कुटुंबाची माहिती आवश्य देईन असेही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.

Loading...
You might also like