उमेदवारी नाकारल्यानंतरही किरीट सोमय्यांना शिवसैनिकांचा विरोधच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यापूर्वी किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईची उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती. त्यांनतर आता किरीट सोमय्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

भाजपाने विद्यमान खासदार सोमय्यांचा पत्ता कापत मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईची उमेदवारी दिली. मात्र नाराजी लपवत मनोज कोटकांचा प्रचार करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे किरीट सोमय्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. सोमय्या प्रचारात असतील तर प्रचार कसा करायचा? असा सवाल शिवसैनिकांनी मनोज कोटक यांना विचारला. प्रचारात किरीट सोमय्या असल्याचे शिवसैनिक प्रचारापासून लांब दिसत आहेत. त्यामुळे किरीट सोमय्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याची मागणी शिवसैनिकांनी मनोज कोटक यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्य केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही शिवसेनेचा विरोध कमी झाला नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like