लोकसभेसाठी शिवसेनेची महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी नंतर आता शिवसेनेनेही राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे.

शिवसेनेने २३ संभाव्य उमेदवारांची यादी घोषीत केली आहे. संभाव्य उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ खालील प्रमाणे

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत, 2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, 3) उत्तर पश्चिम – गजानन किर्तीकर , 4) ठाणे – राजन विचारे, 5) कल्याण – श्रीकांत शिंदे, 6) पालघर – श्रीनिवास वनगा, 7) रायगड – अनंत गिते, 8) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत, 9) कोल्हापूर – संजय मंडलिक, 10) हातकणंगले – धैर्यशिल माने, 11) नाशिक – हेमंत गोडसे, 12) शिर्डी – सदाशिव लोखंडे, 13) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील, 14) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे, 15) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी, 16) बुलढाणा – प्रतापराव जाधव, 17) रामटेक – कृपाल तुमाणे, 18) अमरावती- आनंदराव अडसूळ, 19) परभणी- संजय जाधव.

या उमेदवारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब नाही

20) मावळ – श्रीरंग बारणे, 21) उस्मानाबाद – रवी गायकवाड,

या उमेदवारांवर अजून निर्णय नाही

22) सातारा – पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरस, 23) हिंगोली – हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस

ह्याही बातम्या वाचा –

गांधी-वाड्रा घराण्याचा ‘फॅमीली पॅकेज’ भ्रष्टाचार : भाजपकडून हल्लाबोल

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?