तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात ; अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्याची वेळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर ईव्हीएम मशीन सुरुच न झाल्याने मतदान उशिरा सुरु झाल्याच्या बातम्या अनेक ठिकाणाहून येत आहेत.

माढा लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होत असून या मतदारसंघातील सांगोला येथील एका शाळेमधील मतदान केंद्रावर मशीन एक तासानंतरही सुरु न झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार परत जाऊ लागले होते. औरंगाबाद येथेही दोन मतदान केंद्रावर एक तासानंतरही मशीन सुरु झाले नाही. अहमदनगरमध्ये चुरशीच्या निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर अर्ध्या तासाने मतदान सुरु झाले.

पुणे शहरातही सकाळपासूनच उत्साहात निवडणुकीला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मशीन नादुरुस्त असल्याने ती बदलण्याची वेळ आली.

कोल्हापूरमध्ये ७ ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरु झाली नव्हती. तेथील मशीन बदलण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया अर्धा तास उशिरा सुरु झाले. कोल्हापूरमध्ये अनेक मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर रांगा दिसून आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानापुर्वी त्यांनी सर्वप्रथम गांधीनगर येथे घरी जाऊन आपल्या आईची भेट घेतली.

सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये बजावला मतदानाचा हक्क

पुण्यामध्ये ९३ वर्षांच्या प्रभाकर भिडे यांनी पत्नी सुशीला भिडे (वय ८८) यांच्या सोबतीने मयुर कॉलिनी येथील मतदान केंद्रात मतदान केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींने आपला मतदानाचा हक्क बजावला

Video: मतदानापूर्वी मोदींनी घेतली आईची भेट