निवडणूक जाहीर होताच मोदींनी मागितले जनतेकडे आशीर्वाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकांची तारीख जाहीर होताच चला सशक्त आणि सुरक्षित भारत बनवूया असे म्हणत पुन्हा एकदा एनडीएचे सरकार निवडून देऊया. असे आवाहन करत सबका साथ, सबका विकास या योजनेंतर्गत पुन्हा एकदा एनडीएला तुमचे आशीर्वाद हवेत असे. म्हणणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा निवडणूक आयोगाने आज जाहीर केले आहेत. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकारने आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात मुलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामे केली आहेत. सबका साथ, सबका विकास या संकल्पनेतून भाजपाने विकासाच्या माध्यमातून देशाला उभारण्याचे काम केले आहे. गेल्या ७० वर्षांपासून रखडलेल्या कामांना या 5 वर्षात गती देण्याच काम आम्ही केले. त्यामुळे आता, सशक्त आणि सुरक्षित भारत बनवूया, फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा देत पुन्हा एकदा भाजपप्रणित आघाडीला निवडूण द्या. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट द्वारे केले आहे.

इतकेच नव्हे तर, देशातील सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणूक २०१९ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपण वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुका लढवणार आहोत. मात्र, भारताचा सर्वांगिण विकास आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनविणे हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी म्हंटले.

ह्याही बातम्या वाचा –

#Loksabha 2019 : राज्यातील ४८ मतदार संघात ‘या’ तारखेला मतदान

‘ऐकाहो रावसाहेब जालन्याची जागा मला लढू द्या ना’ : अर्जुन खोतकर

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर ; महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार निवडणूका