राज्यातील ४८ मतदार संघांपैकी ८ दुरंगी, ३७ तिरंगी, ३ चौरंगी लढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात लोकसभा निवडणुका आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचाराचा ज्वर चढत असतानाच पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाची वेळ जवळ आली आहे. येत्या ९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून ११ एप्रिल रोजी अर्ज मार्ग घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासोबतच बहुतेक सर्वच पक्षांचे उमेदवारी जवळपास निश्चित झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये कुणाकुणामध्ये आणि कशी लढत होणार याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. राज्यातील ४८ जागांवर निवडणुका होत आहेत. यामध्ये ८ ठिकाणी दुरंगी ३७ ठिकाणी तिरंगी तर ३ ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.

बहुतेक मतदारसंघामध्ये आघाडी आणि युतीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. तर काही मतदारसंघामध्ये मात्र वंचित बहुजन आघीच्या उमेदवरांकडून कडवं आव्हान उभ राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघामध्ये दिसणाऱ्या संभाव्य राजकीय लढती खालील प्रमाणे…

राज्यातील दुरंगी लढती
१. धुळे 
भाजप – सुभाष भामरे
काँग्रेस – कुणाल पाटील
२. नागपूर 
भाजप – नितीन गडकरी
काँग्रेस – नाना पटोले
३. कल्याण 
शिवसेना – श्रीकांत शिंदे
राष्ट्रवादी – बाबाजी पाटील
४. मुंबई उत्तर 
भाजप – गोपाळ शेट्टी
काँग्रेस – ऊर्मिला मातोंडकर
५. मुंबई उत्तर पश्चिम 
शिवसेना – गजानन कीर्तिकर
काँग्रेस – संजय निरुपम
६. मुंबई उत्तर मध्य 
भाजप – पूनम महाजन
काँग्रेस – प्रिया दत्त
७. शिरूर 
शिवसेना – शिवाजीराव आढळराव पाटील
राष्ट्रवादी – अमोल कोल्हे
८. अहमदनगर 
भाजप – सुजय राधाकृष्ण विखे पाटील
राष्ट्रवादी – संग्राम जगताप

राज्यातील तिरंगी लढती
१. नंदुरबार 
भाजप – हीना गावित
काँग्रेस – के. सी. पडवी
वंचित बहुजन आघाडी (व्हीबीए) – दाजमल गजमल मोरे
२. जळगाव 
भाजप – उन्मेष पाटील
राष्ट्रवादी – गुलाबराव देवकर
व्हीबीए – अंजली बाविस्कर
३. रावेर 
भाजप – रक्षा खडसे
काँग्रेस – उल्हास पाटील
व्हीबीए – नितीन कांडेलकर
४. बुलडाणा 
शिवसेना – प्रताप जाधव
राष्ट्रवादी – डॉ. राजेंद्र शिंगणे
व्हीबीए – बळीराम सिरस्कार
५. अकोला
व्हीबीए – प्रकाश आंबेडकर
भाजप – संजय धोत्रे
काँग्रेस – हिदायत पटेल
६. अमरावती 
शिवसेना – आनंदराव अडसूळ
व्हीबीए – गुणवंत देवपारे
महाआघाडी – नवनीत कौर राणा
७. वर्धा 
भाजप – रामदास तडस
काँग्रेस – चारुलता टोकस
व्हीबीए – धनराज वंजारी
८. रामटेक 
काँग्रेस – किशोर उत्तमराव गजभिये
शिवसेना – कृपाल तुमाने
व्हीबीए – किरण रोडगे
९. भंडारा-गोंदिया 
भाजप – सुनील मेंढे
राष्ट्रवादी – नाना पंचबुद्धे
व्हीबीए – एन. के. नान्हे
१०. गडचिरोली- चिमूर 
भाजप – अशोक नेते
काँग्रेस – डॉ. नामदेव उसेंडी
व्हीबीए – डॉ. रमेश गजबे
११. चंद्रपूर 
भाजप – हंसराज अहिर
काँग्रेस – सुरेश धानोरकर
व्हीबीए – राजेंद्र महाडोळे
१२. हिंगोली 
काँग्रेस – सुभाष वानखेडे
शिवसेना – हेमंत पाटील
व्हीबीए – मोहन राठोड
१३. नांदेड
काँग्रेस – अशोकराव चव्हाण
भाजप – प्रतापराव चिखलीकर
व्हीबीए – यशपाल भिंगे
१४. परभणी 
शिवसेना -संजय जाधव
राष्ट्रवादी – राजेश विटेकर
व्हीबीए – आलमगिर खान अखिल मो. खान
१५. जालना 
भाजप – रावसाहेब दानवे
काँग्रेस – विलास औताडे
व्हीबीए – डॉ. शरदचंद्र वानखेडे
१६. दिंडोरी 
भाजप – भारती पवार
राष्ट्रवादी – धनराज महाले
व्हीबीए – बापू केळू बरडे
१७. नाशिक
शिवसेना – हेमंत गोडसे
राष्ट्रवादी – समीर भुजबळ
व्हीबीए – पवन पवार
१८. पालघर 
शिवसेना- राजेंद्र गावित
बहुजन विकास आघाडी – विष्णू ठाकूर (संभाव्य)
व्हीबीए – सुरेश अर्जुन पडवी
१९. भिवंडी
भाजप – कपिल पाटील
काँग्रेस – सुरेश टावरे
व्हीबीए – डॉ. ए. डी. सावंत
२०. ठाणे 
शिवसेना – राजन विचारे
राष्ट्रवादी – आनंद परांजपे
व्हीबीए – मल्लिकार्जुन पुजारी
२१. मुंबई उत्तर पूर्व 
भाजप – मनोज कोटक
राष्ट्रवादी – संजय दीना पाटील
व्हीबीए – संभाजी शिवाजी काशीद
२२. मुंबई दक्षिण मध्य
शिवसेना – राहुल शेवाळे
काँग्रेस – एकनाथ गायकवाड
व्हीबीए – डॉ. संजय भोसले
२३. मुंबई दक्षिण 
शिवसेना – अरविंद सावंत
काँग्रेस – मिलिंद देवरा
व्हीबीए – डॉ. अनिल कुमार
२४. रायगड 
शिवसेना – अनंत गिते
राष्ट्रवादी – सुनील तटकरे
व्हीबीए – सुमन कोळी
२५. मावळ 
शिवसेना – श्रीरंग बारणे
राष्ट्रवादी – पार्थ पवार
व्हीबीए – राजाराम पाटील
२६. पुणे 
भाजप – गिरीश बापट
काँग्रेस – मोहन जोशी
व्हीबीए – अनिल जाधव
२७. बारामती 
भाजप – कांचन कुल
राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे
व्हीबीए – नवनाथ पडळकर
२८. शिर्डी 
शिवसेना – सदाशिव लोखंडे
काँग्रेस – भाऊसाहेब कांबळे
व्हीबीए – डॉ. अरुण साबळे
२९. बीड 
भाजप – प्रीतम मुंडे
राष्ट्रवादी – बजरंग सोनवणे
व्हीबीए – विष्णू जाधव
३०. उस्मानाबाद 
शिवसेना – ओमराजे निंबाळकर
राष्ट्रवादी – राणा जगजितसिंह पाटील
व्हीबीए – अर्जुन सलगर
३१. लातूर
भाजप – सुधाकर शृंगारे
काँग्रेस – मच्छिंद्र कामत
व्हीबीए – राम गारकर
३२. सोलापूर 
व्हीबीए – प्रकाश आंबेडकर
काँग्रेस – सुशीलकुमार शिंदे
भाजप – जयसिद्धेश्वर स्वामी
३३. माढा 
राष्ट्रवादी – संजय शिंदे
भाजप – रणजितसिंह नाईक निंबाळकर
व्हीबीए – विजय मोरे
३४. सांगली
भाजप – संजय पाटील
स्वाभिमानी पक्ष – विशाल पाटील
व्हीबीए – गोपीचंद पडळकर
३५. सातारा 
राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले
शिवसेना – नरेंद्र पाटील
व्हीबीए – सहदेव एवळे
३६. कोल्हापूर 
शिवसेना – संजय मंडलिक
राष्ट्रवादी – धनंजय महाडिक
व्हीबीए – डॉ. अरुणा माळी
३७. हातकणंगले 
शिवसेना – धैर्यशील माने
स्वाभिमानी – राजू शेट्टी
व्हीबीए – असलम बादशाहजी सय्यद

राज्यातील चौरंगी लढती
१. यवतमाळ- वाशीम
शिवसेना – भावना गवळी
प्रहार – वैशाली येडे
काँग्रेस – माणिकराव ठाकरे
व्हीबीए – प्रवीण पवार
२. रत्नागिरी-सिंधुदुर्ग 
शिवसेना – विनायक राऊत
काँग्रेस – नवीनचंद्र बांदिवडेकर
व्हीबीए – मारुती रामचंद्र जोशी
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष- निलेश राणे
३. औरंगाबाद 
शिवसेना – चंद्रकांत खैरे
काँग्रेस – सुभाष झांबड
एमआयएम – इम्तियाज जलील
स्वाभिमान पक्ष – सुभाष पाटील

दरम्यान, आत्तापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांनुसार या लढतींचं चित्र समोर आलं असून मधल्या काळात यातले काही उमेदवार अर्ज मागे घेण्याची किंवा त्यांचे अर्ज बाद होण्याची देखील शक्यता आहे.

Loading...
You might also like