‘या’ जागांवर भाजपाचे उमेदवार बदलण्याची शक्यता ; उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या १६ मार्चला भाजपा पहिली यादी जाहीर करणार असल्याचे वृत्त आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युती नंतर राज्यात २५ जागांवर भाजपा उमेदवार लढणार आहेत . मात्र ५ ते ६ जागांवर उमेदवार बदलण्याचा विचार सुरु असल्याचेही समोर आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपले ११ उमेदवार जाहीर केले आहेत. याच दरम्यान भाजपा येत्या १६ मार्चला लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे वृत्त आले आहे. इतकेच नव्हे तर, या यादीत १७ ते १८ उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. तसेच  भाजपकडून ५ ते ६ जागांवर उमेदवार बदलण्याचा विचार सुरु असल्याचेही समोर आले आहे . यामध्ये सोलापूर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर, माढा, नांदेड आणि अहमदनगर दक्षिण या जागांचा समावेश असणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे , लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षाला भाजपच्या कोट्यातून १ किंवा २ जागा देण्यात येणार असल्याचेही वृत्त आले आहे.

त्यामुळे भाजपा कोणाकोणाला उमेदवारी देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.