लोकसभा निवडणूक : ‘हे’ आहेत काँग्रेसच्या ‘त्या’ ९ जागांसाठी संभाव्य उमेदवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काहीच महिन्यांचा कालावधी असताना सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसनेही तशी तयारी केली आहे. काँग्रेसच्या विदर्भातील मतदारसंघांची यादी तयार केली आहे. या संभावित उमेदवारांची यादी एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या विदर्भ भाजपने हिसकावून घेतला होता. त्यामुळे काँग्रेसने यंदा भाजपला टक्कर देण्याची तयारी आत्तापासून केली आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी विदर्भातील मतदारसंघांची यादी काँग्रेस लवकरचं जाहीर केली जाईल. यादीत विशेष म्हणजे अकोल्याची जागा भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी काँग्रेस सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरून प्रकाश आंबेडकरांची नाराजी दुर करण्याचे काँग्रेसचे नियोजन असल्याचे समजतं.
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार विदर्भातील लोकसभेच्या जागांसाठी खालील उमेदवारांची वर्णी लागू शकते.
विदर्भातील जागा आणि संभावित उमेदवार
1. वर्धा लोकसभा मतदारसंघ- अमर काळे
2. नागपूर लोकसभा मतदारसंघ- प्रफुल गुडघे पाटील
3. रामटेक लोकसभा मतदारसंघ- नितीन राऊत
4. अमरावती लोकसभा मतदारसंघ – मुकूल वासनिक
5. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ- जीवन पाटील
6. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ – माणिकराव ठाकरे
7. गडचिरोली लोकसभा मतदारसंघ – नामदेव उसेंडी
8. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ- राहुल बोंद्रे