Loksabha Result 2019 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस सर्व जागेवर पिछाडीवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत. एक्झिट पोलने काँग्रेसला ६ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, राज्यात सर्वच जांगावर काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर आहेत. राज्यात नांदेड मतदरासंघातून अशोक चव्हाण हे एकमेव आघाडीवर होते. मात्र ते देखील पिछाडीवर पडल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसे ने सत्ताधारी भाजपा विरोधात प्रचार केला होता. याचा फायदा काँग्रेसला होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मनसेची जादू राज्यात कोठेच दिसून येत नाही. राज्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पिछाडीवर आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे हे देखील पिछाडीवर आहेत.
महाराष्ट्रातील स्थिती
भाजपा – २३
शिवसेना – २०
काँग्रेस – ०
राष्ट्रवादी – ४
इतर – १