बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तेजस्वी सूर्याचा ‘उदय’ ; काँग्रेसचा ‘अस्त’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – २८ वर्षीय तरुण चेहरा तेजस्वी सूर्याला भाजपने उमेदवारी दिल्यामुळे चर्चेत आलेल्या दक्षिण बंगळूरु लोकसभा मतदारसंघात तेजस्वी सूर्याची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तेजस्वी सूर्याला सध्या ६२.९ % मते मिळाली आहेत, त्यामुळे तेजस्वी सूर्याचा विजय निश्चित मानला जातोय. येथून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार बी. के. हरिप्रसाद लढत आहेत. सध्या त्यांना केवळ ३३.३४ % मते मिळाली आहेत. भाजपच्या तेजस्वी सूर्या आणि काँग्रेसच्या बी. के. हरिप्रसाद यांच्यात येथे लढत होत आहे.

तेजस्वी सूर्या हा भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेचा महासचिव आहे. तसेच तो राष्ट्रीय स्वयंसेक संघाशीही संबंधित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध वाहिन्यांवर तेजस्वी सूर्या भाजपची भक्कमपणे बाजू मांडताना दिसून येत होता. इतक्या कमी वयात उमेदवारी मिळालेल्या तेजस्वी सूर्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. भाजपसासाठी हा मोठा विजय ठरेल.

बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे निवडून आले होते. हेगडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येणार होती. परंतु त्यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारून तेजस्वी सूर्या या तरुण चेहऱ्याला भाजपकडून संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करण्यास तेजस्वी सूर्या यशस्वी ठरला आहे. बी. के. हरिप्रसाद हे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत. त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे.

११९६ पासून अनंतकुमार हेगडे बंगळूरू दक्षिण मतदारसंघातुन निवडून येत होते. गेल्यावेळेस या मतदारसंघात अनंतकुमार यांनी आधारचे जनक नंदन निलेकेणी यांचा पराभव केला होता. १९७७ नंतर १९८९ चा अपवाद वगळता येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही.