भंडारा-गोंदीया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून भाजपकडे ; सुनील मेंढे आघाडीवर

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – भंडारा-गोंदीया मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये सुनील मेंढे हे विजय़ाच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसेचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ २०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून भाजपने जिंकला होता. तर आता तो सरळ भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

सध्या कॉंग्रेसकडून नागपूरमधून निवडणूक लढविणाऱ्या नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना तगड्या मतांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता यावेळी भाजपकडून यावेळी सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीकडून नाना पंचबुध्दे यांच्यात थेट लढत झाली. त्यात सुनील मेंढे आघाडीवर आहेत.

नाना पटोले यांनी २०१४ साली या मतदारसंघातून भाजुपसाठी निवडणूक लढली होती. त्यांनी विजय़ मिळविला होता. त्यानंतर त्यांनी भाजपची साथ सोडल्यावर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणूकीत मात्र ही जागा भाजपकडे राहिली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मधुकर कुकडे यांनी हेमंत पटले यांचा पराभव केला होता. त्यानंतर नाना पटोले आता नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात लढत आहेत. तर यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये थेट लढत झाली.