‘पोलीसनामा’चा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला ; गिरीश बापटांनाच लोकसभेचा ‘विजयमुकुट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होती. या मतदार संघात भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यामध्ये दुरंगी सामना झाला. या निवडणुकीत गिरीश बापट हे २,९२,२३५ एवढया मतांनी विजयी झाले. भाजपच्या गिरीश बापट यांना५,७१,९७३ एवढी तर काँग्रेसच्या मोहन जोशी यांना २,७९,७३८ एवढी मते मिळाली. पुणे लोकसभा मतदार संघात एकुण २० लाख ७५ हजार ०३९ मतदार आहेत. त्यापैकी १०,३४,१३० मतदारांनी मतदान केले होते.

‘पोलिसनामा’च्या एक्झिट पोलचा अंदाज खरा

सन २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पुण्यात जाहिर सभा घेतल्या होत्या. मात्र, यंदा पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहिर सभा पुणे शहर आणि जिल्हयात झाली नाही. सुरवातीपासुनच एकतर्फी समजली जाणारी पुण्याची निवडणूक केवळ चर्चेसाठी काही दिवस अटीतटीची झाली मात्र मतदान झाल्यापासुन आज पर्यंत मतदार संघातील मतदार गिरीश बापट हे किमान एक लाखहुन अधिक मतांनी निवडून येतील असा अंदाज ‘पोलिसनमा’ने व्यक्त केला होता. भाजपच्या गिरीश बापट यांना५,७१,९७३ इतकी मते मिळली असून त्यांनी काँग्रेसच्या जोशी यांना त्यांनी २,९२,२३५ इतक्या मतांनी हरवले.

आधिपासून कल बापटांकडेच

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपची उमेदवारी जाहिर झाली आणि तेव्हापासुन बापट आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले. काँग्रेस पक्षाने पुण्यातील उमेदवारी जाहिर करण्यास प्रचंड विलंब केला. सुरवातीला काँग्रेसकडून प्रविण गायकवाड यांच्या नावाची चर्चा झाली मात्र नंतर निष्ठावंतांनी अधिक जोर लावण्याने गायकवाड यांचा उमेदवारीचा पत्‍ता कट झाला. शेवटच्या क्षणी काँग्रेसने उमेदवारीची माळ मोहन जोशी यांच्या गळयात टाकली. निष्ठावंत असलेले मोहन जोशी यांनी प्रचाराला सुरवात केली. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात आला. पण, मतदारांचा कल भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्याच बाजुने अधिक दिसला. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोनमेन्ट आणि कसबा मतदार संघातून गिरीश बापट यांना अतिशय उत्‍तम प्रतिसाद भेटला. एवढेच नव्हे तर शिवसेना, रिपाई आणि इतर मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजप उमेदवार गिरीश बापट यांचा ठासुन प्रचार केला. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी उत्‍तम साथ दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like