लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटलांचा पराभव ; भाजपच्या मनोज कोटकांचा ‘एवढ्या’ मतांनी विजय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उत्‍तर-पुर्व मतदारसंघात भाजपाच्या मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय दीना पाटील यांच्यामध्ये लक्षवेधी लढत होत आहे. या लढतीमध्ये मनोज कोटक यांनी संजय दीना पाटील यांचा पराभव केला. मनोज कोटक यांनी संजय पाटील यांचा २ लाख २६ हजार २४ एवढ्या मतांनी पराभव केला.

भाजपतील जाहीर अंतर्गत विरोध आणि शिवसेनेच्या दबावाचे निमित्त साधत किरीट सोमैय्या यांचा पत्ता कापण्यात आल्याने उत्तर पूर्व मुंबईतील लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मतदारसंघामध्ये १५ लाख ८८ हजार ३३१ मतदान असून ९ लाख ७ हजार ७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात ५१ .७० टक्के मतदान झाले.

उमेदवार – पार्टी – मिळालेली मतं
मनोज कोटक – भाजपा – ५१३५७९
संजय दीना पाटील – राष्ट्रवादी – २८७५५५
निहारिका खोंडाले – वंचित बहुजन आघाडी – ६८०८९