रंगतदार लढतीत काॅंग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव ; भाजपच्या पूनम महाजन ‘एवढ्या’ मतांनी विजयी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात भाजपाच्या पुनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यामध्ये लढत होत आहे. शेवटपर्य़ंत रंगदार अवस्थेत गेलेल्या या लढतीमध्ये पुनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला. महाजन यांनी प्रिया दत्त यांचा १ लाख २७ हजार ४२० एवढ्या मताधिक्याने पराभव केला.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवडणूक अनेक मुद्यांनी चर्चेत राहिली आहे. या मतदार संघामध्ये १६ लाख ७९ हजार ७३१ मतदार संख्या असून ९ लाख १ हजार ४७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या ठिकाणी ४८.७७ टक्के मतदान झाले आहे.

उमेदवार – पार्टी – मिळालेली मतं
पूनम महाजन – भाजपा – ४८१६१८
प्रिया दत्त – काँग्रेस – ३५४१९८
अब्दुल रेहमान अंजारीया – वंचित बहुजन आघाडी – ३३३००