वर्धा मतदरासंघात भाजपचा विजय

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या वर्धा मतदारसंघात यावेळी भाजपच्या रामदास तडस आणि कॉंग्रेसच्या चारूलता टोकस यांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी आयपीएस अधिकारी धनराज वंजारी यांना उतरवून ही निवडणूक तिरंगी केली. त्यात भाजपचे रामदास तडस यांनी विजय मिळवला.

वर्धा मतदारसंघ धक्कादायक निकाल देण्यासाठी प्रसिध्द आहे. एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही. परंतु २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचाराची सुरुवात केलेल्या वर्धा मतदारसंघातून केली होती. त्यावेळी तडस यांना विजय मिळाला. परंतु यावेळीदेखील मोदींनी प्रचाराचा शुभारंभ वर्ध्यामधून केला. तर वंचित बहुजन आघाडीने माजी आयपीएस अधिकारी धनराज वंजारी यांना मैदानात उतरवले. त्यामुळे चुरस आणखी वाढली होती. मागील अनेक वर्षांपासून दिल्लीत राहणाऱ्या चारुलता टोकस यांचा मतदारसंघाशी म्हणावा तसा कनेक्ट नाही. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा त्यांना फटका बसला.

विजयी उमेदवार – रामदास चंद्रभानजी तडस (भाजप) – ५३१६४५
पराभूत – चारूलता राव टोकस (कॉंग्रेस) – ३५६९०९

धनराज कोठीरामजी वंजारी (वंचित बहुजन आघाडी) – ३२२१९

एकूण उमेदवार – १४

वर्धा मतदारसंघातील एकूण मतदार – १७ लाख ४१ हजार ९००

पुरुष मतदार – ८ लाख ९३ हजार १४१

महिला मतदार – ८ लाख ४८ हजार ७४१

वर्धा मतदारसंघामध्ये झालेले मतदान – १० लाख ६५ हजार ७७८