वायनाडमध्ये ७ लाख नाही तर केवळ ‘एवढ्या’ मतांनी राहुल गांधींचा विजय

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीमधून पराभूत झाले असेल तरी केरळमधील वायनाडमधून तब्बल ७ लाख मतांनी विजयी झाल्याने गुरुवारी विविध न्यूज चॅनेलवर दाखविले जात होते. आजवरचा विजयाचा राहुल गांधी यांनी विक्रम केल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात राहुल गांधी यांना ७ लाख मते मिळाली आहेत. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पी. पी. सुनीर यांचा ४ लाख ३१ हजार ७७० मतांनी पराभव केला आहे.

राहुल गांधी यांना ७ लाख ६ हजार ३६७ मते मिळाली तर, पी. पी. सुनीर यांना २लाख ७४ हजार ५९७ मते मिळाली आहेत.
एकाच उमेदवारांनी ७ लाख मते मिळविण्याचा हा या मतदारसंघात पहिल्यांदाच घडले आहे. राहुल गांधी यांना ६४ टक्के मते मिळाली आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमध्ये तब्बल ८ लाख ९४ हजार ६२४ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. सी. जे. चावडा यांना ३ लाख ३७ हजार ६१० मते मिळाली आहेत.