मुंबईत महायुतीची ‘मुसंडी’ तर महाआघाडीचा ‘सुपडा साफ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील एकूण ६ मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेना युतीने मुसंडी मारली असून सर्वच्या सर्व जागांवर आघाडी घेतली आहे. तर मुंबईत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा सुपडा साफ केला आहे.

मुंबई उत्तर पश्चिम

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन किर्तीकर विरुध्द कॉंग्रेसचे संजय निरुपम यांच्या चुरशीची लढाळी. मात्र संजय निरुपम पराभवाच्या छायेत आहेत. शिवसेनेचे गजानन किर्तीकर हे ६५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

उत्तर मध्य मुंबई

उत्तर मध्य मुंबईत पुनम महाजन आघाडीवर आहेत. कॉंग्रेसच्या प्रिया दत्त आणि पूनम महाजन यांच्यात झालेल्या चूरशीच्या लढतीत महाजन यांनी १ लाख २ हजार मतांची आघाडी घेतली आहे. या मतदरासंघात संजय दत्त यांनी प्रिया दत्त यांच्यासाठी रस्त्यावर उतरुन मतदारांना आव्हान केले होते. परंतु याचा काही परिणाम दिसला नाही. तर येथे मनसे फॅक्टरही चालला नसल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण मुंबई

दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या लढाईत मिलिंद देवरा पराभवाच्या छायेत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अरविंद सावंत यांनी तब्बल ४८ हजार मतांची आघाडी घेतली आहे. मिलिंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पाठींबा देऊन येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

उत्तर मुंबई

तर उत्तर मुंबईत कॉंग्रेसच्या उर्मिला मातोंडकरचा पराभव होण्याची चिन्हं दाट झाली आहेत. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी तब्बल १७२४८९ मतांची आघाडी घेतली आहे. मराठी मतदारांचा टक्का जास्त असल्याने कॉंग्रेसने मराठी चेहरा म्हणून सिनेतारका उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली होती. मात्र त्याचा परिणाम येथे दिसला नाही.

उत्तर पुर्व मुंबई

उत्तर पुर्व मुंबईत लक्षवेधी लढतीत भाजपचे मनोज कोटक यांनी राष्ट्रावादी कॉंग्रेसचे संजय दीना पाटील यांच्याविरोधात १८३८४२ मतांची आघाडी घेतली आहे. भाजपतील अंतर्गत विरोध आणि शिवसेनेच्या दाबावाचे निमित्त साधात किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात आला होता. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दक्षिण मध्य मुंबई

दक्षिम मध्य मुंबईमध्ये भाजपचे विद्यमान खासदार राहूल शेवाळे आणि कॉंग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. राहूल शेवाळे यांनी ९६१५० मताधिक्य घेत मुसंडी मारली आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ भाषिक, धार्मिक विविधतेमुळे मिनी इंडीया समजला जातो. त्यामुळे संपुर्ण मुंबईचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. राहूल शेवाळे यांनी ९६ हजारांचे मताधिक्य घेऊन भाजपचा हा गड राखला असल्याची चर्चा आहे.