#Loksabha : महाराष्ट्राबाहेर ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचे मोहमद फैझल विजयी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा निकाल हाती येत असून विविध मतदार संघातील निकाल जाहीर होत आहेत. सतराव्या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राबाहेरही विजयचा झेंडा फडकविला आहे. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रवादीचे उमेदवार मोहमद फैझल यांनी ५१० मतांनी विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादीने लक्षद्वीप या मतदार संघातून मोहमद फैझल यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने हेमदुल्ला सईद यांना मैदानात उतरविले होते. अखेर जनतेने राष्ट्रवादीच्या मोहमद फैझल यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे. लक्षद्वीपच्या या प्रतिष्ठेच्या लढाई मध्ये विजयी उमेदवार मोहमद फैझल यांना १७५११ एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार हेमदुल्ला सईद यांना १७००१ एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या अटीतटीच्या लढाईत मोहमद फैझल यांनी ५१० मतांनी बाजी मारली आहे