अकोल्यात ५ व्या फेरीअखेर प्रकाश आंबेडकर पिछाडीवर तर संजय धोत्रेंची १ लाखावर मुसंडी

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – अकोल्यात पाचव्या फेरीअखेर प्रकाश आंबेडकर पिछाडीवर आहेत. तर पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले संजय धोत्रे य़ांनी पाचव्या फेरीअखेर १ लाखावर मुसंडी मारली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर आणि त्यानंतर कॉंग्रेसचे हिदायत पटेल आहे.

पाचव्या फेरी अखेर संजय धोत्रे यांना १,०२,२२८ मतं मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना ६१,१४२ मतं मिळाली आहेत तर हिदायत पटेल ४५७७० मतांवर आहेत.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यात संजय धोत्रे, प्रकाश आंबेडकर, हिदायत पटेल अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमधूनही निवडणूक लढविली आहे. परंतु या निवडणूकीत त्यांना दोन्ही ठिकाणांहून पिछाडी मिळाली आहे.

Loading...
You might also like