राहूल गांधींचा ‘येथे’ विजय निश्चित तर ‘येथील’ जागा डळमळीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना वायनाडमध्ये ८ लाखांची आघाडी मिळाली आहे. तर अमेठीतून त्यांना १५ हजारांची पिछाडी मिळाली आहे. राहूल गांधी यांनी यावेळी वायनाड आणि अमेठीतून निवडणूक लढविली आहे.

गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन ठिकाणांहून राहूल गांधी यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांना सकाळपासूनच मतमोजणी सुरु झाल्यावर राहूल गांधी वायनाडमधून आघाडीवर होते. तर अमेठीत भाजपकडून स्मृती इराणी यांनी कड़वे आव्हान राहूल गांधींविरोधात दिले होते. २०१४ ला पराभूत झाल्यानंतरही स्मृती इराणी यांनी पुन्हा कडवे आव्हान निर्माण केले. त्यात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून कधी स्मृती इराणी कर कधी राहूल गांधी आघाडीवर होते. आघाडीपिछाडीचा खेळ सुरुच होता. त्यात आता राहूल गांधी यांना पिछाडीवर टाकत स्मृती इराणी यांनी १५ हजारांची आघाडी घेतली.

तर वायनाडमध्ये राहूल गांधी यांना तब्बल ८ लाख मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा वायनाडमधील विजय निश्चित झाला आहे.