सुजय विखेंची विजयाच्या दिशेने वाटचाल ; ७१ हजार ५५ मतांनी आघाडीवर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होत आहे. सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच ठेवली असून पाचव्या फेरीअखेर ७१ हजार ५५ मतांची आघाडी घेतली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदार संघातील निकालाकडे महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले होते . महाराष्ट्रात सर्वाधीक चर्चा याच जागेची झाली अहमदनगर लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होती. राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप तर भाजपकडून डॉ.सुजय विखे यांच्यामध्ये थेट सामना झाला.

अहमदनगर लोकसभा मतदार संघात एकुण १८ लाख ५४ हजार २४८ हजार मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ९१ हजार ६०१ एवढया मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात सरासरी ६४. २६ टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा प्रचंड गाजली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजिव डॉ. सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने लागलीच त्यांना उमेदवारीही दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने राष्ट्रवादी -काँग्रेसचे संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवलं.