पोलीसनामाचा ‘एक्झिट पोल’ खरा ठरला ; सुप्रिया सुळेंची विजयाच्या दिशेने घोडदौड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बारामती मतदारसंघात चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज पोलीसनामाने वर्तवला होता. सुप्रिया सुळे ५० हजार मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु केली आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली.

पहिल्या फेरी पासून उत्कंठा वाढवणाऱ्या या मतदारसंघातील उमेदवारांमध्ये लीढ घेण्यात चढाओढ झाल्याचे दिसून आले. काही फेऱ्यांमध्ये भाजपाच्या कांचन कुल आघाडी घेत होत्या तर सुप्रिया सुळे पिछाडीवर पडत होत्या. सुरूवातीला चार हजार मतांनी आघाडी पिछाडी सुरु असताना सुप्रिया सुळे यांनी ५० हजार मतांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीने बारामती मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपाने कांचन कुल यांना उमेदवारी देऊन हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला. कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजापा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. तर सुप्रिया सुळे याच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार हे बारामती मतदारसंघात तळ ठोकून होते.

You might also like