आंध्र प्रदेशात तेलगू देसमचा सुपडा साफ तर वायएसआर कॉंग्रेसची ‘मुसंडी’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –आंध्र प्रदेशात तेलगू देसमचा सुपडा साफ होत असल्याचे दिसते आहे. आंध्र प्रदेशातील १७५ पैकी जगनमोहन रेड्डी यांची वायएसआऱ कॉंग्रेस १४२ जागांवर मुसंडी मारली आहे. तर टीडीपीला केवळ २८ जागांवर आघाडी मिळाली आहे. आंध्रप्रदेशात लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यामुळे राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे.

आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरची घौडदौड ही चंद्राबाबूंना मोठा धक्का मानला जात आहे. १७५ पैकी केवळ २८ जागांवर असलेली आघाडी ही टीडीपीला आंध्रप्रदेशातील जनतेने दिलेला मोठा झटका आहे. चंद्राबाबू नायडू यांची लोकसभा निवडणूकीतही पिछाडी आहे. त्यांना विधानसभेसोबत लोकसभेतही सपाटून मार खावा लागला आहे. सुरुवातीला आंध्रप्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २४ जागांवर जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरला आघाडी मिळाली होती. आंध्र प्रदेशात भाजप आणि कॉंग्रेसला दोन्ही पक्षांची मतं खाता आलेली नाहीत. सत्तेत असलेल्या टिडीपीला सपाटून मार खावा लागल्यानंतर आता विधानसभेत वायएसआरची सत्ता येणार असेच चित्र आहे. तर जगनमोहन रेड्डीच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तर पवन कल्याण यांचा जनसेवा पक्ष केवळ १ जागेवर पुढे आहे.