युपीत एक्झिट पोल फेल, भाजपा आघाडीवर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपा यांना घवघवीत यश मिळेल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. मात्र, आज मतमोजणी सुरु झाल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज फेल ठरताना दिसत आहे. एक्झिट पोलने उत्तर प्रदेशात सपा-बसापाला ५६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.

उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले होते. मात्र, लोकसभा निवडणूक भाजपाला सोपी नव्हती. या ठिकाणी सपा-बसपाला घवघवीत यश मिळेल अशी शक्यता होती. परंतु मतमोजणी सुरु झाल्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये भाजपा ५६ जागेवर तर सपा-बसपा २२ जगांवार आघाडीवर आहे. तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी हे पिछाडीवर आहेत. तर वायनाडमध्ये आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात ८० जागांवर मतदान झाले. उत्तर प्रदेशातील निकालावर देशाचे लक्ष लागले होते.