लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येताच मोदींना उद्देशून रितेश देशमुख म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज सकाळी आठ वाजल्यापासून लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून निकालाचे प्राथमिक कल समोर येताना दिसत आहेत. त्यानुसार, भाजपाने देशभरात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शिवाय भाजपाने 2014 चे रेकॉर्ड ब्रेक करण्याचेही काम केले आहे. सर्वत्र भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष होताना दिसत आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. लोकसभेच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे समर्थन करण्याचा पवित्रा घेणाऱ्या रितेशची खिलाडू वृत्ती यातून दिसून येते.

आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधान नेरंद्र मोदींचे अभिनंदन करताना रितेश म्हणतो की, “भारताने निर्णय घेतला आहे – लोकशाही साजरा करणे आवश्यक आहे. आमच्या माननीय पंतप्रधानांना खूप खूप शुभेच्छा.”

 

दरम्यान, एप्रिल महिन्यात नाशिक येथील प्रचारसभेत बोलताना रितेश देशमुखने मोदींच्या 56 इंच छातीवर खोचक टीका केली होती. रितेश म्हणाला होता की, “आपले पंतप्रधान 56 इंच छाती मिरवत आहेत परंतु 56 इंचाचे तर गादरेजचे कपाट देखील असते. अशा आशयाचे टीकास्त्र रितेशने सोडले होते.

सध्या देशभरातील मतदारसंघात मतमोजणी सुरु आहे. काही वेळात फायनल निकाल देखील होती येईल. परंतु समोर आलेले निकालाचे कल पाहता देशात पुन्हा एकदा भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे दिसते आहे.