‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी’ ; निकालानंतर सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्वीट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काल झालेल्या लोकसभेच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्या. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडणून आलेले नाहीत, त्यामुळे अटीतटीच्या या लढतीत त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर त्यांनी विजयाचा जल्लोष न करता एक भावनिक ट्विट केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी ; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी !!”, अशा ओळी सुप्रिया यांनी ट्विटरवर शेअर केल्या आहेत.

बारामतीसाठी भाजपचा जोर

या मतदारसंघात राष्ट्रवादीबरोबरच भाजपने देखील जोर लावला होता. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या ठिकाणी जोर लावत स्वतः तळ ठोकत प्रचार केला होता. त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, सगळ्यांनी कांचन कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचं चित्र निर्माण करण्यास भाजप यशस्वीही झाली होती.

मात्र या सगळ्यात शरद पवार यांनी देखील आपल्या लेकीसाठी जोर लावला होता. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यासाठीच विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी “श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!”, या ओळी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केल्या आहे. २०१४ साली देखील सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून विजयासाठी संघर्ष करावा लागला होता.

You might also like