साताऱ्यात राजांचे मनोमिलन नावापुरतेच

नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला पाठ

सातारा :  पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, चित्र वेगळे असल्याचे दिसून येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकिला खसदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघे उपस्थित होते.

मात्र या दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. या बैठकीला ठरावीकच पदाधिकारी उपस्थित होते.खासदार उदयनराजे यांच्या प्रचारासाठी येत्या रविवारी (दि.२४) शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. या सभेला अंतर्गत वाद बाजूला ठेवून ही सभा मोठी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. मात्र, अद्याप देखील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचे या बैठकीत बघायला मिळाले. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या भाषणात रविवारी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रचार सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

तर आमच्यात असलेले गैरसमज दूर झाला असल्याचा दावा उदयनराजे यांनी केला आहे. दरम्यान, सातारा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची राष्ट्रवादी कार्यालयात बैठक झाली. खासदार उदयनराजे भोसलेंसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदार उपस्थितीत होते. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर जिल्ह्यातील आमदारांसोबत ही पहिलीच बैठक होती. दरम्यान, या बैठकीकडे रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाठ दाखवली.