मोदी नव्या नवरीसारखे ; काम कमी, बांगड्याच जास्त वाजतात : नवज्योतसिंग सिद्धू

इंदौर : वृत्तसंस्था – भारताचे माजी खेळाडू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नव्या नवरीशी केली आहे. ‘मोदी नव्या नवरीसारखे आहेत. जे काम कमी करतात, पण बांगड्याच जास्त वाजवतात. या वादग्रस्त विधानाने खळबळ माजली आहे. सहाव्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचारासाठी सिद्धू काल इंदौरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच या सरकारला सत्तेतून हद्दपार करा, असं आवाहनही त्यांनी इंदूरवासियांना केलं.

पुढे बोलताना सिद्धू म्हणाले कि, मोदीजी नव्या नवरीसारखे आहेत, जे भाकऱ्या कमी भाजतात, पण बांगड्यांचा आवाजच जास्त करतात. काम करत आहे असं शेजाऱ्यांना वाटलं पाहिजे. मोदी सरकारची अशीच गत आहे, अशी खोचक टीका त्यांनी मोदींवर केली. मोदी सरकार खोटे बोलत असल्याची टीका देखील त्यांनी केली. यावेळी मोदींचा नवा चित्रपट येतोय. फेकू नंबर वन हे त्याचे नाव असल्याची टीका त्यांनी केली. ‘ना राम, ना रोजगार, गल्लीबोळात मोबाइलमध्ये रमणारा बेरोजगार मिळाला,’ अशी टीकाही यावेळी बोलताना त्यांनी केली.

दरम्यान, दहा रुपयांचे पेन खरेदी करताना दुकानदाराकडून बिल घ्यायला हवे, असं मोदी देशातील जनतेला सांगत असतात. पण राफेल विमानांच्या खरेदीच्या किंमतींबाबत चर्चा होते, तेव्हा ते हडबडून का जातात ? असा थेट सवालही त्यांनी केला.

Loading...
You might also like