राज्यात २३ एप्रिलला ‘या’ १४ मतदारसंघात होणार मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीच्या तारखा जाहिर केल्या आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान राज्यातील निवडणूका पार पडणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात २३ एप्रिलला महाराष्ट्रात १४ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये जळगांव लोकसभा मतदारसंघ, रावेर लोकसभा मतदारसंघ, जालना लोकसभा मतदारसंघ, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ,रायगड लोकसभा मतदारसंघ, पुणे लोकसभा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघ, अहमदनगर लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ, सांगली लोकसभा मतदारसंघ, सातारा लोकसभा मतदारसंघ, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग लोकसभा मतदारसंघ, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, या मतदार संघांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून, सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. पहिल्या टप्प्यासाठी ७ दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

#Loksabha 2019 : राज्यातील ४८ मतदार संघात ‘या’ तारखेला मतदान
#Loksabha Election 2019 : पुणे, बारामती २३ ला तर मावळ, शिरुर २९ ला मतदान
राज्यात ११ एप्रिलला ‘या’ ७ मतदार संघात होणार मतदान