महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुक लढवणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुक लढवणार नाही हे आता स्पष्ट केले आहे. त्याबाबत मनसेचे नेते गिरीष सावंत यांनी आज (रविवारी) पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. मनसेची लोकसभा निवडणुकीबाबत नेमकी काय भुमिका आहे याकडे सर्वच राजकीय पक्षांसह मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर मनसेने आज लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मनेसेने सन 2014 मध्ये लोकसभा निवडणुक लढविली होती. अलिकडील काळात मनसे राष्ट्रवादीला साथ देणार असे बोलले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टिका करत राज ठाकरे हे शरद पवार यांनी लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचुन दाखवतात म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभेचे वातावरण तापले आहे. त्यामध्येच मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेबाबत लवकरच भुमिका स्पष्ट केली जाईल असे 13 व्या वर्धापददिनी सांगितले होते. आज (रविवारी) मनेसेने लोकसभा निवडणुक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us