हिंगोलीत तिरंगी लढतीत शिवसेनेचा भगवा फडकला

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ च्या मोदी लाटेतही कॉंग्रेसने विजय मिळविलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात….ने आपला झेंडा फडकवला आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड आणि कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी झाले. तर कॉंग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेत कॉंग्रेसची लाज राखणारा निकाल हिंगोलीत लागला होता. राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना हरवून १६३२ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या लोकसभा निव़डणूकीत राजीव सातव यांनी आपली उमेदवारी जाहिर न करता त्यांनी पक्षाचं गुजरातेतील काम पाहण्याचं ठरवलं. त्यानंतर तगडा उमेदवार येथे देण्याचे आव्हान कॉंग्रेसवर होते.

परंतु शिवसेनेतून भाजप आणि नंतर कॉंग्रेसमध्ये गेलेले सुभाष वानखेडे यांना आयत्यावेळी उभे करण्यात आले. सुभाष वानखेडे आणि शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्यात चुरस होईल असे वाटले होते. परंतु वंचित बहुजन आघाडीने हिंगोलीत कॉंग्रेसला चांगलाच झटका दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने तेथे मोहन राठोड यांना उमेदवारी देऊन येथील निकालाची गणितंच बददली आहेत. त्यामुळे येथील निवडणूक कॉंग्रेसऐवजी वंचित विरुध्द शिवसेना अशी लढत रंगलेली दिसली.

हिंगोली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने जातीय समीकरणांचा सकारात्मक वापर करण्याच्या हेतूने आपला उमेदवार दिला आहे. या मतदारसंघात अनुसुचित जाती ११.११ टक्के, अनुसुचीत जमाती – १२.५७ टक्के, इतर मागास प्रवर्ग ३५. १९ टक्के मतदार आहे. त्यात बंजारा, हटकर, बौध्द वंजारी, माळी, गहोंड, भिल्ल, या आदीवासी जमाती यांचं मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात बंजारा समाजाचं मतदान सुमारे ३ लाख आहे.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने हिंगोली मतदारसंघात बंजारा उमेदवार दिला. मोहन राठोड यांना उमेदवारी दिल्याने हिंगोली मतदार संघातील गणितं बदलली. तर प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारादरम्यान ३ जंगी सभा घेतल्या. या सभांना मतदारांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर गाव पातळीवरील नियोजन, जातीय नेत्यांच्या भेटी यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी वंचितला कौल दिल्याचे दिसते. मात्र या सभांच्या गर्दीचे मतात रुपांतर झाले नाही.

विजयी – हेमंत पाटील

पराभूत – सुभाष वानखेडे, मोहन राठोड

५ वाजून ५५ मिनिटांची आकडेवारी

हेमंत पाटील (शिवसेना) – ४१४३३८

मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी) – ११८७९२

सुभाष वानखेडे कॉंग्रेस – २१७१५१

हिंगोलीतील एकूण मतदार – १७ लाख ३२ हजार ५४०

पुरुष मतदार – ९ लाख ५२ हजार २२९

महिला मतदार – ८ लाख २७ हजार २९८

हिंगोलीत झालेले मतदान- ११ लाख ५२ हजार ५४८ टक्केवारी – ६६.२९