शिर्डी येथील चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आघाडीवर

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी लोकसभा मतदार संघात चुरशीची तिरंगी लढत होती यात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे आघाडीवर आहेत. शिर्डी मतदार संघात शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून संजय सुखदान यांच्यामध्ये थेट तिरंगी सामना आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी चा बालेकिल्ला राखला होता ,त्यांनतर यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी शिर्डीतून विजयाची पताका फडकवण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा संघात एकुण १५ लाख ८४ हजार ३०३ हजार मतदार आहेत. त्यापैकी १० लाख २२ हजार ४६१ एवढया मतदारांनी मतदान केले होते.

दरम्यान २०१४ मध्ये काँग्रेसचे भाऊसाहेब वाघचौरे यांचा शिर्डी लोकसभा मतदार संघात पराभव करीत सदाशिव लोखंडे प्रसिद्धी झोतात आले होते. मात्र मागील निवडणुकीत वाकचौरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसकडून उमेदवारी घेतली आणि त्यात त्यांचा पराभव झाला.

Loading...
You might also like