शिरूर, औरंगाबादेत मोठी चुरस ; सध्या ‘हे’ उमेदवार आघाडीवर

शिरूर /औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – देशभराचे लक्ष आज चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालावर आहे.राज्यात लक्ष लागलेल्या मतदार संघांपैकी शिरूर आणि औरंगाबाद या शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासुनच चुरस पाहायला मिळत आहे.

शिरूर मतदार संघात राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे तर शिवसेनेकडून आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. औरंगाबाद मतदार संघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे तर काँग्रेसचे सुभाष झांबड , एमआयएमचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव तर स्वाभिमान पक्षाचे सुभाष पाटील यांच्यात लढत सुरु आहे.

सकाळपासून जसजसे निकाल हाती येत आहेत त्यानुसार शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तर औरंगाबाद मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात मोठी चुरस रंगणार आशिया चर्चा होती मात्र. सकाळच्या टप्प्यात एमआयएमचे इम्तियाज जलील हे आघाडीवर होते.

त्यानंतर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या स्थानावर तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर होते. मात्र आज दिवसभरात मतमोजणी सुरु असताना अगदी संध्याकाळ पर्यंत शिरूर आणि औरंगाबाबद मतदार संघात उमेदवारांमध्ये आघाडी/ पिछाडी अशी चुरस चालूच राहणार अशी चिन्हे आहेत.

औरंगाबाद मतदार संघ

औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सलग चार वेळा खासदार झाले आहेत. यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं होत. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली आहे.

औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसने पक्षाने सुभाष झांबड यांना तिकीट दिल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंद केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना ५ लाख २० हजार ९०२ मतं मिळाली तर सुरेश पाटील यांना ३ लाख ५८ हजार ९०२ मतं मिळाली होती.

शिरूर मतदार संघ

एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदारसंघाचे राजकारण काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अवतीभोवती फिरत होते. मात्र २००४ साली शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रुपात शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव केला. मागील निवडणुकीत शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांचा तब्बल तीन लाख एक हजार ७५८ मतांनी पराभव केला होता.