वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदार संघातून पिछाडीवर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर लोकसभा मतदार संघात चुरशीची तिरंगी लढत होती यात भाजपचे उमेदवार सिद्धेश्वर महाराज हे आघाडीवर आहेत. सोलापूर मतदार संघात भाजपकडून सिद्धेश्वर महाराज तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये थेट तिरंगी सामना आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद बनसोडे यांनी सोलापूरचा बालेकिल्ला राखला होता ,त्यांनतर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी दिली होती ते याठिकाणी आघाडीवर आहेत. आणि ज्या वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र्भर चर्चा झाली त्याचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पिछाडीवर आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे सेक्युलर मत खातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती . ते आता खरं ठरत असून सुशीलकुमार शिंदे त्यामुळेच पिछाडीवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान २०१४ मध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर लोकसभा मतदार संघात पराभव करीत शरद बनसोडे प्रसिद्धी झोतात आले होते.

दरम्यान ,सोलापूर लोकसभा संघात एकुण १८ लाख ५० हजार ००२ हजार मतदार आहेत. त्यापैकी १० लाख ८१ हजार ३८६ एवढया मतदारांनी मतदान केले होते.