एक्झिट पोलनुसार एनडीएची मोठी आघाडी

फिर एक बार मोदी सरकारलाच मतदारांचा देशभरात पाठिंबा, २०१४ पेक्षा अधिक जागांवर भाजप आघाडीवर

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्व चॅनेलने एनडीए ला बहुमत मिळणार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आता मतमोजणीचे निकालही पुढे येत असून एनडीएने ३३० मतदारसंघांत आघाडी घेतली असून काँग्रेस आघाडी १०९ जागांवर आघाडीवर असून इतर पक्ष १०२ जागांवर आघाडीवर आहे. देशभरातून फिर एक बार मोदी सरकारला मतदारांनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे.

सर्वाधिक चर्चा झालेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने मुसंडी मारली असून आतापर्यंत १५ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे़ ओडिशामध्येही भाजपला चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या ते १२ जागांवर आघाडीवर आहे. नवीन पटनाईकचा जेडीयुला ८ ठिकाणी आघाडी मिळाली आहे.

उत्तर प्रदेशातही सपा बसपा महागठंबला फारसा पाठिंबा मिळालेला दिसत नाही. येथे भाजप आघाडीने आतापर्यंत ५६ जागांवर आघाडी घेतली आहे. सपा बसपा ला केवळ २२ जागांवर आघाडी मिळाली आहे.
दिल्लीतील सातही जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे.